महाराष्ट्र

मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल; “घरच नाही तर…?

Published by : Lokshahi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक खोचक सवाल विचारला आहे. नुकतीच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली असून त्यावरून आता मनसेनं राज्य सरकारला सवाल विचारला आहे. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच शनिवारी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वांसमोर आले. आणि जनतेची संवाद साधला आहे.

यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक घोषणा केली की, "२०१७ मध्ये शिवसेनेने वचननामा दिला होता. त्यातील अनेक वचने पूर्ण केले आहेत. पण मुंबईकरांसाठी ५०० फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन विचारपूर्वक दिले होते. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत असे म्हणत मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंत घरं असणाऱ्या सर्वांना मालमत्ता करांमधून सूट देण्याचा निर्णय़ जाहीर करण्यात आला आहे.

या घोषणेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज आपल्या ट्विटरवरून एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये एक चित्र असून कोळी बांधव 'आवक विभाग' अशी पाटी लिहिलेल्या कार्यालयासमोर उभं राहून दाद मागत असून "मराठी माणसाला मुंबईतून वसई-विरारला हद्दपाल केलं. आता भूमिपुत्राची अवस्था तीच करणार आहात का?" असा प्रश्न ते विचारत आहेत. मुख्यमंत्र्यांसारखी एक व्यक्ती कार्यालयाच्या दरवाजात उभी असून त्यांच्या हातात 'कोस्टल रोड मच्छिमार्केट', असं लिहिलेली बॅग आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी