विदर्भात गुटखा खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गुटख्यात वापरल्या जाणाऱ्या सुगंधित तंबाखूवर बंदी असली तरी जिल्हाच प्रत्येक भागात सुगंधित तंबाखूचा व्यवसाय जोमात सुरू आहे. सुगंधाच्या नावावर भेसळ करणाऱ्या बनावट कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली. या धाडीत 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील तळोधी- बाळापुर हद्दीतील वलनी येथे सचिन वैद्य यांचा फॉर्महाऊस येथे मजा, ईगल व हुक्का अशा कंपनीचे सुगंधीत तंबाखू (tobacco) आणून ते एका मशीनच्या साहायाने भेसळ करण्याचा गोरखधंदा सूरू असल्याची माहिती मिळाली. (Police raid on tobacco factory reveals black business in Vidarbha)
भेसळ केलेला तंबाखू मजा सुगंधीत तंबाखुचा डब्यात सिलबंद करून तो सुगंधीत तंबाखू मजा म्हणून अवैधरित्या विक्री करत होते. याची माहिती पोलिसांना लागताच पोलिसांनी फार्महाऊसवर धाड टाकली. या धाडीत 25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी (police) जप्त केलाय. विशेष म्हणजे या बनावट गोरखधंद्यात 25 ते 30 वयोगटातील मुलांचा वापर केला जात आहे. घटनास्थळावरूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सलमान आरीफभाई कासमानी, वैभव करकाडे, सागर गजभिये, वैभव भोयर, मयुर चाचेरे, खेमराज चटारे असे आरोपींची नावे आहेत.