राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याविरोधात हरियाणाच्या अंबाला कोर्टात याचिका दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप करत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या 7 जुनला सुनावणी होणार आहे.
एंटी टेरोरिस्ट फ्रंट इंडिया आणि ब्राह्मण महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश शांडिल्य यांनी या संदर्भातील याचिका केली आहे. या याचिकेवर त्यांचे म्हणणे आहे, महाराष्ट्रात हनुमान चालिसाचे पठण करण्यावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याविरोधात 295-A अंतर्गत धार्मिक भावना भडकाल्याचा आरोप गुन्हा दाखल करण्याची याचिका अंबाला कोर्टात दाखल केली आहे.
वीरेश शांडिल्य यांनी राणा दाम्पत्याविरोधात झालेल्या घटनेवर संताप व्यक्त केला. ही घटना लाजिरवाणी असल्याचे म्हटले. तसेच 100 करोड हिंदु बांधवांच्या भावनांशी खेळ करण्याचा अधिकार कोणाला नाही आहे. तसेच शांडिल्य यांनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वाच्या विरूद्ध आणि हनुमान चालिसा विरोधात असे विचार ठेवणारे सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असेही त्यांनी म्हटले.
बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते, त्यांनी पंतप्रधान पद धुडकारल आहे, पण त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे राजकिय फायद्यासाठी बाळासाहेब ठाकरेंची अब्रु धुळीस मिळवत असल्याचे वीरेश शांडिल्य यांनी सांगितले आहे.