महाराष्ट्र

धक्कादायक! भूतबाधेतून मुक्त करण्यासाठी आई-वडिलांची सहा वर्षीय मुलीला मारहाण; चिमुकलीचा मृत्यू

सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी पोटच्या मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली जबर मारहाण केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नालसकर | नागपूर : सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी पोटच्या मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली जबर मारहाण केली. या मारहाणीत सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांसहीत एकाला अटक केली आहे.

नागपूरच्या सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची अवस्था, सतत आजारी राहणे आणि तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र, त्याचा काहीच फायदा होत नव्हता.

शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता.

आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढला. मात्र, रुग्णालयाच्या आवारात एका लहान मुलीचे मृतदेह बेवारस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत हे मृतदेह या ठिकाणी कोणी आणून ठेवले याची माहिती मिळवली. मृतदेह कोणत्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यात आले त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला आहे. याप्रकरणी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेसला मोठा धक्का; पृथ्वीराज चव्हाण पराभूत

Mahim Assembly Election Results 2024: माहीम विधानसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीमध्ये महेश सावंत विजयी

Ajit Pawar: शरद पवारांना धक्का, बारामतीमधून अजित पवार विजयी

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी