मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या (Money Laundering) आरोपांखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणीत वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध होते. तसेच, मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचेही न्यायालयाने म्हंटले आहे.
हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या मलिक संपर्कात
नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात ईडीने (Enforcement Directorate) दाखल केलेल्या आरोपपत्रावर कोर्टाने म्हंटले की, मलिकांचा दाऊदच्या (dawood) लोकांशी संबंध असल्याचे सुकृतदर्शनी पुरावे समोर आहेत. ते कुर्लास्थित गोवावाला कंपाउंड जमीन प्रकरणात (Kurla Property Deal) मनी लाँडरिंग आणि गुन्हेगारीमध्ये सामिल होते. मलिक यांनी मुनीर प्लम्बरच्या ताब्यात असलेली जमीन बळकावण्यासाठी डी-गँगचे सदस्य असलेल्या मुनिरा खान, सलीम पटेल आणि सरदार खानसोबत मिळून कटकारस्थान रचल्याचे सत्र न्यायधीश आर.एन. रोकडे यांचे म्हणणे आहे.
गोवावाला कंपाऊंडसाठी मलिकांनी हसीना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत बैठका झाल्या. यानुसार न्यायालयाने मलिक आणि सरदार सहावली खान विरोधात कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
अंडरवर्ल्ड मनी लाँडरिंग (Underworld Money Laundering) प्रकरणात नबाब मलिक यांना ईडीने काही महिन्यापूर्वी अटक केली होती. सध्या मलिक हे न्यायालयीन कोठीत असून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती आहेत.