Navneet ravi rana  Team Lokshahi
महाराष्ट्र

Navneet Ravi Rana: राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेची नोटीस

Published by : left

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना आता मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस बजावली आहे. 4 मे ला फ्लॅट तपासणीसाठी येत असल्याची माहिती या नोटीसीत देण्यात आली आहे. खारमधील घराला ही नोटीस बजावली आहे.

राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. याआधी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa) केल्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. या अटकेनंतर आता आज त्यांना जामीन मिळणार होता.मात्र राणा दाम्पत्याचा (Rana Couple) कोठड़ीतील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे. त्यानंतर आता त्यांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस बजावली आहे.

राणा दाम्पत्यांच्या खारमधील घराला आता मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. अवैध बांधकाम प्रकरणी राणा दाम्पत्याच्या घरावर ही नोटीस चिकटवली आहे. या नोटीसीनुसार आता मुंबई महापालिकेच पथक 4 मे ला फ्लॅट तपासणीसाठी येणार आहेत.त्यामुळे आता या तपासणीत काय बाहेर येते ? त्याचबरोबर राणा दाम्पत्य यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे