महाराष्ट्र

मोठी बातमी! मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचे सुरतच्या दिशेने स्थलांतर

मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतून हा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे.सूरतच्या हिरे कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो.

सूरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी डायमंड हब इमारत गुजरातमधील सूरत येथे बांधण्यात आली आहे. त्यामुळे आता सूरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला हिरे व्यवसाय बंद करून सूरतला निघाले आहेत. सूरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापाऱ्याला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सूरतच्या हिरे कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हिरे सगळीकडे पाठवले जातात. सूरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते.

सूरत डायमंड बोर्स ही इमारत तयार होण्यापूर्वीच ही कार्यालये हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती. बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन सरकारकडून येथे जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या कारण सूरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे. ही इमारत ६७ लाख चौरस फूट जागेवर बांधण्यात आले असून या टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची ४३०० कार्यालये आहेत. असे सूरत डायमंड असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सूरत डायमंड बोर्सचे समिती सदस्य दिनेश भाई नावडिया यांनी सांगितले. सूरत डायमंड बोर्समुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी