महाराष्ट्र

MG Motors ठरली हाइब्रिड ऊर्जेचा वापर करणारी पहिली कार कंपनी

Published by : Lokshahi News

एमजी मोटर इंडिया ही कंपनी आता हाइब्रिड ऊर्जेचा वापर करणारी पहिली पॅसेंजर कार कंपनी ठरली आहे. एमजी कंपनी राजकोटमधील क्लीनमॅक्स हायब्रिड पार्कमधून ऊर्जा स्वीकारणार आहे व पुढील १५ वर्षे कंपनीकडून ही ऊर्जा स्विकारता येईल.

एमजी मोटर इंडियाने हलोल येथील आपल्या एमजी उत्पादन केंद्राला ४.८५ मेगावॅट पवन-सौर संकरित ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी आशियाची सर्वात विश्वासार्ह शाश्वत ऊर्जा सहकारी कंपनी क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. (क्लीनमॅक्स) बरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे एमजी मोटर्स कंपनी १५ वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे २ लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन टाळण्यात यशस्वी होणार आहे, ज्याचे मूल्य १३ लाखांहून अधिक झाडे लावण्याइतके आहे.

२०२२ पर्यंत आपली क्षमता १२० मेगावॅटपर्यंत वाढविण्याची कंपनीची योजना आहे. एमजी कंपनीचे हलोल केंद्र फेब्रुवारी २०२२ पासून राजकोटमधील क्लीनमॅक्स हायब्रिड पार्कमधून ऊर्जा स्वीकारणे सुरू करेल अशी अपेक्षा आहे व पुढील १५ वर्षे कंपनीकडून ही ऊर्जा स्विकारता येईल.

क्लीनमॅक्सबरोबर आम्ही साधलेला सहयोग म्हणजे हरित उत्पादन परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने आम्ही उचललेले आणखी एक पाऊल आहे. या निर्णयाद्वारे आम्हाला एका शाश्वत पर्यावरणाची उभारणी करण्याच्या कामातील आपली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडता येईल, अशी आम्हाला आशा आहे, असे एमजी मोटर इंडियाचे प्रेसिडंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजीव छाबा म्हणाले.

"एमजी मोटर इंडियाने आपला सस्टेनिबिलीटी पार्टनर म्हणून क्लीनमक्सची निवड केली हा आमचा सन्मान आहे. कंपनीच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी ५० टक्‍के ऊर्जा आमच्या संकरित प्रकल्पातून पुरविली जाणार असल्याने एमजी मोटर इंडियाच्या कार्यान्वयन खर्जामध्ये मोठी बचत झालेली दिसणार आहे व त्याचवेळी त्यांच्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घटही होणार आहे, असे क्लीनमॅक्सचे संस्थापक आणि एमडी कुलदीप जैन म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी