मुंबई
राज्य सरकारमधील गोंधळ पुन्हा समोर आला आहे. राज्याचे आरोग्य सचिव म्हणतात गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना पाठवले आहे. दुसरीकडे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मास्क सक्ती नाही तर ऐच्छिक असल्याचे सांगितले आहे. यामुळे राज्य सरकारमधील गोंधळात-गोंधळ समोर आला आहे. आता अधिकाऱ्यांनी ऐकायचे कोणाचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी पत्रक काढले असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलतांना मास्क सक्ती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणतात आरोग्यमंत्री
राज्यात काही भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मास्क सक्ती करण्यात आल्याचं वृत्त आले. पण कोणत्याही प्रकारे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही, मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे, अस स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. सचिवांनी काढलेल्या पत्रकामध्ये मास्क घालणं हे मस्ट (Must) असे म्हटले. परंतु मस्ट शब्द सक्ती असा न वाचता केवळ मास्क वापरण्याचं आवाहन असा वाचावा. त्यामुळं मास्क नसल्यास कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
आरोग्य सचिवांच्या पत्रात काय
मास्क सक्ती रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृहात लागू गेली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने पत्र काढले आहे. या पत्रात मास्क वापरणे सक्तीचे असल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
कुठे असणार मास्क सक्ती
मास्क सक्ती रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा