पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. शरद पवार आज पिंपरीतल्या नाट्य संमेलनाला उपस्थित राहिलं आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील याठिकाणी उपस्थित आहे. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी संवाद साधला.
प्रशांत दामले म्हणाले की, अचानक अध्यक्षपद मिळाल्यामुळे मला अचानक मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटते. फक्त उत्तम गोष्ट अशी आहे की माझे सहकारी माझे बाप आहेत. चुकू नये मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालेलो आहे. संपूर्ण ज्ञान असणारी मंडळी माझ्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे आम्ही चुकणार नाही. याची मला खात्री आहे. नाट्यगृहाचे दर, लाईट बिल, सुविधांची वानवा आहे. त्याकडे सरकारने लक्षं द्यावं. नाट्यगृह योग्यरीत्या मेंटेन ठेवायला हवीत.
आमच्या कलाकारांसाठी नाट्य संमेलन ही दिवाळी आहे. आम्ही कलाकार मंडळी तीन तास नाटकं करतो. पण 365 दिवस 24 तास अभिनय करणारी ही मंडळी मंचावर आहेत. शासनाने आम्हाला योग्य त्या उपाययोजना पुरवाव्यात. रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा गोडवा निर्माण करावा. शासनाने दिलेला निधी योग्यरीत्या आपण वापरायला हवा. असे प्रशांत दामले म्हणाले.