महाराष्ट्र

विरारच्या ICICI बँकेत मॅनेजरचाच अपहार, 26 लाखांचा गंडा

Published by : Lokshahi News

वसई-विरार च्या ICICI बँकेत लुटमार आणि खून करणारा आरोपी अनिल दुबेने स्वत: मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या अॅक्सिस बँकेत 26 लाख 84 हजाराचा अपहार केल्याचं उघड झालं आहे. वसईच्या नायगांव येथील अॅक्सिस बँकेत अनिल दुबे मॅनेजर पदावर होता. आपल्या या पदाचा त्यांन दुरुपयोग करून, हा अपहार केल्याचं उघड झालं आहे.

बँकेत दिवसभरात जमा झालेली रोख रक्कम करन्सी चेकसाठी पाठवण्याऐवजी, करन्सी साठी गाडीच आली नाही, असा बहाणा करून, ग्राहकाच्या खात्यात अॅडजेस्ट करू, असे बोलून ती रक्कम स्वत:च्या बॅग मध्ये नेऊन अपहार केला आहे.

विरारच्या ICICI बँक दरोड्याच्या घटनेच्या आदल्या दिवशीच 28 जुलैला दुबेने हा अपहार केला आहे. अॅक्सिस बँकेच्या क्लस्टर हेड यांच्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाण्यात भादवी कलम 408, 409 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी