महाराष्ट्र

Mahabaleshwar: महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर धुक्यात हरवले; पर्यटक भारावले

थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणारे महाबळेश्वरचे सौंदर्य खुलून निघाले आहे.

Published by : Team Lokshahi

थंड हवेचे ठिकाण आणि महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणारे महाबळेश्वरचे सौंदर्य खुलून निघाले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात. डिसेंबरचा महिना सुरू झाला आहे. वातावरणात गुलाबी थंडीचा अनुभव महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना चांगलाच अनुभव देत आहे. महाबळेश्वर पाचगणी परिसरातील सर्व पर्वतरांगा सूर्योदयानंतर पांढरे शुभ्र दाट धुक्यांनी नाहून निघतात, जणू बर्फाच्छादित पर्वत रांगा असल्याचा अनुभव पर्यटकांना येतो.

महाबळेश्वर लॉडविक पॉईंट बॉम्बे पॉईंट केड्स पॉइंट, विल्सन पॉईंट लिंगमळा परिसर पांगरी ,भिलार, पाचगणीमधील टेबल लँड परिसर सिडनी पॉइंट हे सर्व सकाळ-सकाळी दाट धुक्यांमध्ये हरवून जातात. याचा मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.

महाबळेश्वर हे देशातील अनेक पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरमध्ये या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येतात. सध्या महाबळेश्वरचे सर्वच रस्ते धुक्यामध्ये हरवून गेले आहे. माऊंटन हिलवर गेल्यानंतर प्रत्येक उंचीवर असणाऱ्या पॉईंटवरून खोलदरीत पाहिल्यानंतर सर्वत्र पांढरे शुभ्र आभाळ धरतीवर उतरण्याचा आभास होतोय. यातच सोनेरी सूर्यकिरण या धुक्याचं सौंदर्य वाढवत आहे. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर सिलसिला चित्रपटातील एक गाणं अलगद ओठांवर आहे, ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी