शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली. लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यापाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानंतर आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमाच्या सर्व शिक्षण मंडळाच्या शाळा हा नियम लागू असेल सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊ पर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे.
लहान मुलांची शाळा ९ नंतर घ्या अशी सूचना राज्यपाल बैस यांनी सरकारला केली होती. मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली होती.