राज्यात 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी उद्योगांशी बुधवारी सामंजस्य करार करण्यात आले. दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्या दोन दिवसांत महाराष्ट्राने तब्बल 3 लाख 53 हजार कोटींची गुंतवणुकीचे करार केला आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झटपट निर्णय घेणारे राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे जाणवले.
तसेच गुंतवणुकीचे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे राज्यात २ लाख रोजगारनिर्मिती होईल. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.