मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केलेल्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडूंनी एक विधान केलं आहे.
एका माध्यमाशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या प्रकरणी सचिन तेंडुलकर यांना राज्य सरकारने नोटीस पाठवून जाब विचारला पाहिजे. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. भारतरत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन गेमला प्रोत्साहन देणं योग्य नाही. हे चुकीचं आहे. त्यामुळे सचिन यांना नोटीस पाठवून त्यांना जाब विचारला जावा. असं बच्चू कडू म्हणाले.