मागील काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबवरून गदारोळ सुरू आहे. त्यातच काही ठिकाणी औरंगजेबच्या पोस्टरवरून, स्टेटसवरून दंगली, राडे अशा देखील घटना घडल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या आठवड्यात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन फुले वाहिली होती. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या भेटीवरून भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका होत असताना आता या भेटीबाबत प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मोठा दावा देखील केला आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
औरंगजेबच्या कबीराला भेट का दिली? याबाबत माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, 'संभाजीराजे संगमेश्वरला का गेले? यावर मोठा वाद आहे. ते तिथे गेले ही माहिती औरंगजेबपर्यंत कशी पोचली? जयचंदमुळे गेले, असे इतिहासात आहे. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोहोचवली. आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा. हे वस्तुस्थितीला धरून नाही. हिंदू, मुस्लिम, जैन, हिंदू हा वाद जो देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो तो बरोबर नाही. संभाजीराजे यांच्या हत्येत हिंदू सहभागी होते. संभाजीराजेंना जी शिक्षा झाली त्याची मी निंदा करतो. असे ते म्हणाले.
असे देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, 'औरंगजेबाने आदिलशाहा, बिजापूरच्या राजालाही मारुन टाकलं, पण संभाजी महाराजांना मारताना त्याने जी क्रुरता केली. ती त्याला कुणी करायला सांगितली. संभाजीराजेंची हत्या केली. पण त्यांना पकडून देणारा आणि त्यांना शिक्षा कशी व्हावी, हे सांगणाऱ्याचा आपण निषेध करत नाही. तेच इथले खरे जयचंद आहेत असे मी मानतो. असेही ते म्हणाले. पुढे त्यांनी कबरीला का भेट दिली यावर भाष्य केले. ते म्हणाले, मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानं, फुलं वाहिली. माझ्या त्या निर्णयामुळे औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल थांबली.' असा दावा त्यांनी यावेळी केला.