राजकारण

'एकनाथ शिंदे यांचा आदर, पण आमच्या मनात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री'

Vinayak Mete यांच्या वाढदिवसानिमित्त आणि केलेल्या कार्याबद्दल अभिष्टचिंतन सोहळा मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पार पडत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : तुम्ही वेषांतर करुन रणनीती करत होते. व शेवटी तुम्ही स्वतःचं सरकार आणून दाखवलं. या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. पण, आमच्या मनात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री आहेत, असे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी म्हंटले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि केलेल्या कार्याबद्दल अभिष्टचिंतन सोहळा मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे पार पडत आहे. यावेळी ते बोलत होते.

गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाची मागणी कोणीही पहिली नाही. तुम्ही पण आरक्षण देण्याचं काम तुम्ही केले. मागचं नालायक सरकार होतं. त्यांनी एकाही समाजाला न्याय दिला नाही. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण यांनी घालवले. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम यांनी केलं गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार मागील सरकारने केला. यामुळे आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. पण, आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहेत, असे मेटे यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, मी या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले. पण, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी लक्ष दिलं नाही. माझी विनंती आहे की शिंदे आणि तुम्ही मिळून राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र लिहा आणि निधी आम्ही गोळा करू. तुमच्या बद्दल आम्हाला खात्री आहे.

अडीच वर्ष तुम्ही भेटला नाहीत, रात्री वेशांतर करून तुम्ही रणनीती करत होते. पण, शेवटी तुम्ही स्वतःचं सरकार आणून दाखवलं, असे म्हणत विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. तुम्ही शब्द दिला होता. सरकारमध्ये घेण्याचा ते जरी पाळणार नसतील तरी आम्ही तुमच्या सोबत असू. तुम्ही आम्हाला न्याय दया अन्याय द्या पण आम्ही शेवट पर्यंत तुमच्या सोबत राहणार आहोत, असे शब्द विनायक मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

आम्ही वेडे मराठे आहेत, प्रेम किती करायला लागलं तर कळत नाही. तुम्ही श्रीरामासारखे अनेक विकासाचे पूल बांधाल आणि त्यात खारीचा वाटा शिवसंग्रामचा असणार आहे. पण त्या खरीला विसरू नका, त्याला नेहमी जवळ ठेवा, असेही त्यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने तुम्ही सत्ता चालवता. पण मागच्या अडीच वर्षात 5 मिनिट सुद्धा शिवाजी महाराज यांच्या समुद्रातील पुतळ्याच्या आढावा बैठकीला वेळ दिलं नाही, अशी टीकाही विनायक मेटे यांना तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव; भाजपचे राजेश वानखडे यांचा विजय

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव

Amit Thackeray : माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा पराभव; पोस्ट शेअर करत म्हणाले...

Tivsa Vidhansabha, Amravati : तिवसामधून यशोमती ठाकूर यांचा दारूण पराभव ; कॉंग्रेसला मोठा धक्का

Amol Khatal win Sangamer Assembly Election Result 2024: बाळासाहेब थोरातांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; अमोल खताळ विजयी