मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते, असे सांगितले जात आहे. यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. ठाण्यात मृत्यूचं तांडव असताना मुख्यमंत्री मात्र विश्रांती घेत आहेत, अशी टीका विरोधकांनी केली आहे. तर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री बदलाबाबत सांगितले आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी "त्यांच्या" दिल्ली दरबारी वेगाने हालचाली वाढल्याचे कळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आरोग्याचं कारण पुढे करून त्यांचा राजीनामा घेऊन अजित पवार ह्यांना मुख्यमंत्री करणारं? कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना निलंबित करणार आणि त्यांचा राजीनामा घेणार? असे त्यांनी म्हंटले आहे. काय वाटतं भाजपचा काय "प्लॅन" असेल? असा प्रश्नही वडेट्टीवारांनी विचारला आहे.