राजकारण

Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीची विकेट पडणार

चंद्रकांत पाटलांनी घेतला नाना पटोलेंच्या विधानाचा समाचार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) भाजपची (BJP) विकेट पडणार असल्याचे विधान कॉंग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले होते. या विधानाचा आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी समाचार घेतला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, नाना पटोले यांचे म्हणणे आहे ते 20 तारखेचा निकाल लागण्यासारखे आहे. ते त्यांची स्क्रिप्ट आतापासूनच तयार करत आहेत. राजकारणात जिंकेपर्यत केव्हा विकेट पडेल याबाबत काही बोलायचे नाही. विकेट मविआची पडणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्यातला बेबनावचा फायदा आम्हाला होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. संजय राऊत अपक्षांना घरगडी समजत आहेत, अशी टीकाही चंद्रकांत पाटलांनी केली.

अग्निपथ योजना जाहीर करण्यात आल्यानंतर देशाच्या अनेक भागात हिंसक आंदोलनं केली जात आहेत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आंदोलन करायला हरकत नाही फक्त ते लोकशाही मार्गाने व्हायला. अग्निपथ योजना काय ते तरुनांनी समजून घ्यायला हवे. तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी