Prakash Ambedkar | Sharad Pawar Team Lokshahi
राजकारण

पवारांबद्दल आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, आजही भाजपाबरोबर

शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच 23 जानेवारी रोजी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती जाहीर झाली. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वंचित आघाडीबरोबर जाण्याबद्दल आपली भूमिका जाहीर केली नाही. या सर्वादरम्यान, आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार आजही भाजपाबरोबर असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं, असे ते यावेळी म्हणाले.

काल पवारांना शिवसेना-वंचित आघाडीच्या युतीबद्दल सवाल करण्यात आला. त्यावर ते म्हणाले होते की, “मला काही माहिती नाही, मी या भानगडीत पडत नाही,” यावरच आता आंबेडकरांनी सांगितले की, “शरद पवार यांच्याशी माझं जुनं भांडण आहे. पुढील काळात जुने सर्व काही विसरुन पवार आमच्याबरोबर येतील, अशी मला आशा आहे.” असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी