शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात प्रथमच अंधेरी पोटनिवडणुक जाहीर झाली. ही निवडणुक जाहीर होताच राजकीय वर्तुळात हालचालींना सुरुवात झाली. अनेक घडमोडी घडल्यानंतर शेवटी ही निवडणुक पार पडली. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. मतमोजणीअखेर ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. ऋतुजा लटके यांच्या शिवसेना (ठाकरे गटात) उत्साहाचे वातावरण आहे. त्यावरच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटाला मिळालेल्या विजयानंतर शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ऋतुजा लटके या विजयानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्या, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, या निवडणुकीत विरोधकांनी अनेक कटकारस्थान केली मात्र तरी आपलीच मशाला पेटली. या विजयांनी लढाईची सुरवात झाली आहे. या पुढच्या निवडणुकात देखील विजय आमचाच आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मीताई ठाकरे, आदित्य ठाकरे, ऋतुजा लटके उपस्थिती होत्या.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लढाई आता सुरू झाली आहे. आम्ही विजयानी सुरूवात केली. विरोधकांबद्दल मला काही बोलायचे नाही. त्यांच्या बद्दल बोलण्यात मुर्खपणा आहे. या निवडणुकीत नोटा एवढीच मतं त्यांना मिळाली असती. मात्र, एका गोष्टींचे वाईट वाटते की धनुष्यबाण गोठवले. ज्यांच्या मागणीवरुन गोठवलं ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असतील तर ही मतं त्यांना मिळाली असती. “नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
तरीही आपण विजय मिळवला. या विजयाचे श्रेय मी शिवसैनिकांना महाविकास आघाडीला आणि इतर सर्व सहकारी पक्षाना देतो आणि त्यांचे आभार मानतो. साधारणपणे निवडणुका लक्षात ठेवून कामी केलं जातात. सर्व प्रकल्प ओरबाडून गुजरातमध्ये नेते. आता पंतप्रधानांना महाराष्ट्राबद्दल प्रेम आले आहे. त्यामुळे हवेतल्े प्रकल्प महाराष्ट्रात देण्यात आले आहे. हा फुगा फुटण्याआधी निवडणुका होतील असा आमचा अंदाज आहे. असे विधान त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.