Shrikant Shinde team lokshahi
राजकारण

श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला, म्हणाले मर्सिडीज मधून पक्ष वाढू शकत नाही त्यासाठी...

श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

Published by : Shubham Tate

शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर पक्ष मजबुतीसाठी नेते आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. याचमाध्यमातून ते राज्यीतील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, विरोधकांकडून त्यांच्यावर खोचक टीका केली जात आहे. आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (shrikant shinde criticism aditya thackeray)

एकनाथ शिंदे यांना सर्वच स्तरातून समर्थन मिळत आहे. लोकांना हवं होतं ते सरकार आलेलं आहे. सर्वसामान्यांचं सरकार आणि सर्व समन्यांचा मुख्यमंत्री असल्याने, येणाऱ्या काळात अडीच वर्षात जी कामं झाली नाहीत. ती कामं दोन महिन्यात या सरकारने केलं, असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी अकोल्यात केलं.

पक्ष वाढवण्यासाठी रिक्षावाले, पान टपरीवालेच लागतात मर्सिडीज मधून पक्ष वाढत नाही असा टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर लगावला आहे. आतापर्यंत श्रीकांत शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले नव्हते. पण आता दोन्ही गटातील अंतर वाढत असून आरोप-प्रत्यारोप देखील वाढत चालल्याचे यातुन दिसत आहे. पक्ष संघटनेसाठी आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ असल्याचेही शिंदे यांनी वक्तव्य केले आहे.

एकनाथ शिंदेना रिक्षावाला म्हणून हिणवलं जात. महाराष्ट्रात रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकत नाही का, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होऊ शकत नाही का. रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याचं शल्य त्यांच्या मनात आहे. सोन्याचा चमचा घेऊन आले तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? शिंदे साहेबांनी दाखवून दिलं, आज एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी