शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झाले आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. गेल्यावर्षी अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झाले होते. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास होता.
1999 ते 2008 नॅशनल हेवी इंजिनियरिंग चे अध्यक्ष होते. सलग 20 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. तसेच 2014 व 2019 शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती. टेंभू योजनेचे जनक म्हणून देखील त्यांची ओळख होती.