Uddhav Thackeray | Sharad Pawar Team Lokshahi
राजकारण

शिवसेना नाव, चिन्ह गमावल्यानंतर शरद पवार-उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा

उध्दव ठाकरे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल करणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यामुळे उध्दव ठाकरे आक्रमक झाले असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल करणार आहे. याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी उध्दव ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केली.

चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिल्यामुळं ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. या निर्णयावर स्टे आणण्यासाठी ठाकरे गट सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे समजते आहे. उद्या याचिका दाखल करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार-उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केली. दोघांमध्ये काय चर्चा झाली याचे तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत. तरी निवडणूक आयोगाच्या निकालावर व कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या धनुष्यबाणाच्या वादात मी पडणार नाही एकदाच सांगितलंय, असे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले होते. तसेच, निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्यावर चर्चा काही करता येणार नाही. ते स्वीकारुन नविन चिन्ह घ्यावं लागेल, असा सल्ला त्यांनी उध्दव ठाकरेंना दिला होता.

Oath Taking Ceremony: कोण होणार मुख्यमंत्री? वानखेडेवर भव्य शपथविधी सोहळा

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महायुतीचा शपथविधी 25 तारखेला वानखेडे स्टेडियमवर होणार

Ulhasnagar Assembly Election 2024 Result: उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांचा पराभव करत कुमार आयलानी विजयी

Vasai Virar Vidhansabha: वसई-विरार, नालासोपाऱ्यात बविआला मोठा धक्का, क्षितिज ठाकूर यांचा दाणुन पराभव

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव