मुंबई : महाराष्ट्रनंतर बिहारमध्येही राजकीय भूकंप झाल आहे. नितीश कुमार यांनी भाजपाशी युती तोडली असून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवते. शिवसेनेवरही भाजपनं आघात केला, असा थेट आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
शरद पवार म्हणाले की, भाजपच्या अध्यक्षांनी अस वक्तव्य केल की प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत. आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहिल. नितीश कुमारांची तक्रार आहे तीच तक्रार ही अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजप त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षाला हळूहळू संपवतात. सेना-भाजप एकत्र होते. सेनेत दुरी कशी करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली. आणि सेनेच्या मित्र पक्षानेच सेनेवर आघात केला, असा घणाघाती आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही.जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितले नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही, असे ही शरद पवार म्हंटले आहे. तर, नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड तसेच मंत्रिमंडळ विस्तारावर महिलेचा समावेश प्रकरणी काहीही प्रतिक्रिया देण्यास शरद पवार यांनी नकार दिला आहे.
दरम्यान, संसद चालवण्याची आस्था केंद्र सरकारमध्ये आहे, असं वाटतं नाही. चर्चेचा मार्ग बंद करतात, अशाही टीका पवारांनी केली आहे.