राजकारण

मुंबई गुन्हे शाखेची नोटीस; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, गावगुंडांना...

मुंबई गुन्हे शाखेने संजय राऊतांना नोटीस धाडली असून मुख्यमंत्री कार्यालयाबाबत केलेल्या विधानाप्रकरणी उत्तर मागितलं आहे. यावर संजय राऊतांनी भाष्य केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुंडांना फोन जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत पोलिसांनी राऊतांना नोटीस बजावली आहे. यावर आता संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी याबाबत ऐकले आहे. अशी जर नोटीस आली असेल तर मी पुराव्यासह नक्कीच उत्तर देईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

मी याबाबत ऐकले आहे. अशी जर नोटीस आली असेल तर मी पुराव्यासह नक्कीच उत्तर देईल. सध्याचे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि असं जर नसते तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे लुटमारीचे आरोप आहेत ते सरकारमध्ये सामील झाले नसते. माझ्या म्हणण्याला तो आधार आहे ज्यांच्यावर चार्जशीट आहे, जामिनावर सुटले आहेत, ईडी-सीबीआयच्या ते तुमचे सहकारी आहेत मी म्हणतोय त्यात तथ्य आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

बाकी गावगुंडांना गोळा केले आहे. राहुल कुल, राधाकृष्ण विखे पाटील, झाकीर नाईककडून घेतलेला फंड, दादा भुसे अशी अनेक प्रकरणे मी दिले. अब्दुल सत्तार यांचे प्रकरण किती मोठे आहे हे गुन्हेगार नाहीत का? यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जात नाहीत का? आधी मला नोटीस पाठवणाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे. त्यांना नोटीस पाठवा, चौकशीला बोलवा मग बघतो मी, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, 17 आणि 18 जुलैला बंगळुरूमध्ये राष्ट्रभक्त पार्टीची बैठक आहे ही विरोधी पक्षांची बैठक नाही. ही काय स्पर्धा नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि मी स्वतः या बैठकीला जाणार आहे. पाटण्यानंतर आता बंगळुरूमध्ये ही बैठक होत आहे. 18 प्रमुख पक्षांनी त्यावेळी उपस्थिती लावली होती. प्रमुख देशभक्त पक्ष जे लोकशाही टिकवण्यासाठी हुकूमशाहीविरोधात एकत्र येणार आहेत. 22 ते 23 पक्ष एकत्र येतील आणि लोकसभा आणि देशाच्या प्रश्नावर चर्चा होईल. शरद पवार सुद्धा या बैठकीला हजर असणार आहेत. 17 तारखेला सोनिया गांधी यांनी डिनरचे आयोजन केले आहे. संध्याकाळी आणि सकाळी अशी दोन टप्प्यात ही बैठक होणार आहे, अशीही माहिती त्यांनी सांगितली.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे