संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे कितीवेळा बोलणार. राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेलं स्क्रिप्ट वाचत आहेत. तुम्ही शिवसेनेच्याबाबतीत त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वत: शिवसेना हा पक्ष सोडलेला आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केलेला आहे.
आता याक्षणी ते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशाप्रकारची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे महाराष्ट्र त्यांना फार गांभीर्याने घेतं मला दिसत नाही. राज ठाकरेंचा एक चष्मा आहे. ते त्या चष्मातून स्वत:च्याच नजरेनं पाहतात. माझं असं म्हणणं आहे 25 वर्षापेक्षा जास्त काळ राज ठाकरे यांना पक्ष सोडून झालेला आहे. त्यानंतर आमचा पक्ष फार पुढे गेला.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे सातत्याने निवडणुका लढतात आणि हरतात. आज 2024च्या निवडणुकीत आमच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही. तरीसुद्धा आम्ही लाखो मतं घेऊन आम्ही 9 खासदार निवडून आणलं हे राज ठाकरे विसरत आहेत. जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. असे संजय राऊत म्हणाले.