राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच काल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू उद्योजक सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी सदानंद कदमांना ही अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. 'ईडी' च्या युक्तीवादानंतर न्यायालयाने कदमांना 15 मार्चपर्यंत 'ईडी' कोठडी सुनावली आहे.
साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. आता सदानंद कदमांना अटक झाल्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.