Eknath Shinde Supreme Court : एकनाथ शिंदेच्या गटात आता आणखी एक नाव सामील झाले आहे. शिवसेनेच्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हेही नॉट रिचेबल असल्याचे समजत आहे. यामुळे सामतांनीही बंडखोरी केल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गटाचे बळ आता वाढणार आहे. तर दुसरीकडे विलीनीकरण हा पर्यया शिंदे (eknath shinde) गटासमोर उपलब्ध आहे. आधीच्या कायद्यात गट बनवणे शक्य होतं. मात्र आत्ताच्या कायद्यात हे शक्य नाही. हे निलंबनापासून विलीनीकरणाशिवाय वाचू शकत नाहीत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सरकार टिकवण्यासाठी मोठे शर्तींचे प्रयत्न करताना दिसत आहेत. (Rebel Shiv Sena MLA Eknath Shinde approaches Supreme Court against the disqualification notices issued)
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महाधिवक्तांशी चर्चा करुन शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे गटाने या कारवाई विरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचा गटनेता बदलण्यात आला आहे. त्याला नरहरी झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे, भरत गोगावले या दोघांकडून दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
बंडखोरांनी गुजरात आणि आसाम राज्य निवडलं आहे. शिंदे यांच्याकडे संख्याबळ आहे, तर मग ते गुहावाटीला जाऊन का बसले आहेत, मुंबईत का येत नाहीत?, असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. तसेच दोन्ही राज्ये भाजपच्या ताब्यात आहेत. शिंदे काल म्हणाले, पॉवरफुल्ल शक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे. मग ती पॉवरफुल्ल शक्ती नक्की कोण?, हे मी सांगण्याची गरज नाही, अस म्हणत त्यांनी भाजप यात सामील असल्याचे वक्तव्य केले आहे.