राजकारण

आमदार होताच रवींद्र धंगेकर गिरीश बापटांच्या भेटीला; प्रकृतीची केली विचारपूस

कसबा या मतदारसंघात भापला मोठा धक्का बसला असून 28 वर्षांचा बालेकिल्ला ढासळला आहे. कसब्याचे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत असलेला कसबा या मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला आहे. यात भापला मोठा धक्का बसला असून 28 वर्षांचा बालेकिल्ला ढासळला आहे. कसब्याचे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. यानंतर धंगेकरांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना टिळक वाड्यात जाऊन अभिवादन केले होते. तर, आज खासदार गिरीश बापट यांची भेट घेत धंगेकरांनी प्रकृतीची विचारपूस केली.

कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजप-मविआने प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही पक्षांतील बड्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी कसब्यात हजेरी लावली होती. अशातच, राजकारणापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ खासदार गिरीश बापट हे अखेर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सक्रिय झाले होते. प्रकृती अस्वस्थ असतानाही ऑक्सिजन सिलेंडरसह बापटांनी व्यासपीठावर हजेरी लावली. नाकात ऑक्सिजनची नळी असून गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशातही गिरीश बापट यांनी मेळाव्यात सहभागी होत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला होता. परंतु, यानंतर बापटांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावरुन विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर त्यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली. व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दरम्यान, कसब्यात मविआचे रवींद्र धंगेकरांना 73 हजार 197 मते मिळाली आहेत. तर, भाजपच्या हेमंत रासनेंना 62 हजार 244 मते मिळाली आहेत. विजयानंतर धंगेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. लोक नितीन गडकरी, शरद पवार यांना नमस्कार करतील. पणं, फडणवीसाचा पुढचा काळ चांगला नाहीय. फडणवीस कुरघोडीचे राजकारण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

Oath Taking Ceremony: कोण होणार मुख्यमंत्री? वानखेडेवर भव्य शपथविधी सोहळा

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महायुतीचा शपथविधी 25 तारखेला वानखेडे स्टेडियमवर होणार

Ulhasnagar Assembly Election 2024 Result: उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांचा पराभव करत कुमार आयलानी विजयी

Vasai Virar Vidhansabha: वसई-विरार, नालासोपाऱ्यात बविआला मोठा धक्का, क्षितिज ठाकूर यांचा दाणुन पराभव

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव