राजकारण

आताचं सरकार ही सहारा चळवळ; राज ठाकरेंचा घणाघात, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे शिबिरातून सराकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कर्जत : मी तुम्हाला सहकार चळवळ समजवायला आलो नाही. घरात बसून बोलायचं मराठी माणसांना धंदा येत नाही, मराठी माणूस शांतपणे धंदा करतो, तो शोबाजी करत नाही. आताचे सरकार सहकार चळवळ नव्हे ती सहारा चळवळ आहे. एकमेकांना सहारा देऊन सरकार चळवळ सुरू आहे, असा जोरदार टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे लगावला आहे. ते आज मनसे शिबिरातून बोलत होते.

राज ठाकरे महणाले की, सर्व महाराष्ट्रातील विरोधातील लोकांची सहकार चळवळ सुरू आहे. आपल्याकडचे नेते लाचार झालेत, मिंध्ये झालेत. त्यांना पाठिंबा नाही स्वाभिमान नाही. या सर्वांनी आपला स्वाभिमान गहाण टाकला आहे, तुम्ही टाकू नका, असेही त्यांनी म्हंटले आहे.

गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. सर्वात जास्त सहकार महाराष्ट्रात आहे. महानंदा ही डेअरी अमूल गिळंकृत करते का आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इतिहास आपल्याला शिकवत असतो हातातून गोष्टी गेल्यावर काहीच मिळणार नाही.

मराठवाड्यात पाणी नाही फक्त राजकारणासाठी उसाचे कारखाने उभे केलेत. पाणी कुठून देणार यामुळे भविष्यात मराठवाड्यात वाळवंट होणार, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण, त्याचा राजकारणी विचार करत नाही आणि आपण जातीपातीसाठी भांडातोय हे सर्व चालवलं जातंय, मराठी माणसं एकत्र राहू नये यासाठी षडयंत्र सुरू असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

सध्या अतिशय हळूवार पद्धतीने आपल्या जमिनी काढून घेतल्या जातील. सध्या या भागात विमानतळ होत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात बाहेरचं लोक येऊन तुमच्या नाकावर टिच्चून आपल्या जमिनी बळकावणार आहेत. जमिनी बळकावण्यासाठी परप्रांतियांची सहकार चळवळ सुरू आहे. जमिनी हातातून गेल्यावर पश्चातापाची वेळ येईल. आपल्या बाजूला जे काही चालू आहे त्याबाबत सतर्क रहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्राची चळवळ वाढली पाहिजे. ती तुम्ही वाढवा आणि जी महाराष्ट्र उद्ध्वस्त करणारी चळवळ उद्ध्वस्त करून टाका. मुंबईवरही हात घालतील. विदर्भाचा तुकडा ही पाडतील हे 70 वर्षांपासून सुरू आहे. या देशाचा पंतप्रधान मराठ्यांनी बसवला. अटकेपार झेंडा मराठ्यांनी पोहचवलाय. निवडणुकांसाठी दारुगोळा जमा करून ठेवलाय आज फक्त छोटीशी पिशवी उघडलीय, असेही राज ठाकरेंनी म्हंटले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेसला मोठा धक्का; पृथ्वीराज चव्हाण पराभूत

Ajit Pawar: शरद पवारांना धक्का, बारामतीमधून अजित पवार विजयी

जालन्यात शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयी

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव