राजकारण

दारू, मटण पार्ट्यासाठी निवडणुका लढवायच्या का? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावले

राज ठाकरेंचा रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सज्जड दम

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पक्ष सांगेल ते काम करावं लागेल अन्यथा पदावर राहता येणार नाही, असा सज्जड दम मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पदाधिकाऱ्यांना दिला आहे. लोकसभेची निवडणूक का लढवायची? दारू, मटण पार्ट्यासाठी निवडणुका लढवायच्या का, असा सवालही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारला आहे. राज ठाकरे दोन दिवस कोकणात आहेत. आगामी मुंबई महानगर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सत्र सुरू केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार व्हावा आमदार व्हावा, असं वाटतं. पण, तसा खासदार व आमदार होण्यासाठी तसा व्यक्तीही असणे गरजेचे आहे. लोकांना वाटलं पाहिजे की हा आपले प्रश्न सोडवू शकेल असा माणूस जिंकणे गरजेचा आहे. आपला पक्ष जिंकला पाहिजे आता मेळाव्यात संख्या किती आहे, असे विचारत 515 यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप झाला पाहिजे होईल की नाही असे सांगितले. त्यांनी वैभव खडेकर यांचे नाव घेत यांना सगळ्यांना हकायचे काम करा म्हणजे ती गुरे नाहीत हे लक्षात ठेवा असे सांगत या सगळ्याची जबाबदारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष यांच्यावर दिली आहे.

पक्षाची शाखा नव्हे तर नाका झाला पाहिजे तुम्ही संध्याकाळी जाताना तोच नाका असे विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. असे सांगत उद्या हाच नाका महिलांना व युवतींना मोठा आधार वाटला पाहिजे हे लक्षात ठेवा, असाही महत्वाचा सल्ला त्यांनी दिला. पुण्यात काय चाललं आहे यांचे त्यांनी उदाहरण दिले एका आयएस अधिकाऱ्यांचे उदाहरण देत राज ठाकरे यांनी सांगितले की तो आयएस अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होता. त्याला विचारल्यावरती त्यांनी सांगितलं की, अरे तो मुख्यमंत्री टेम्पररी आहे मी परमनंट आहे, असे सांगत त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी