राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. महायुतीमध्ये भाजपकडून नुकतेच काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली.
प्रफुल पटेल हे २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. त्यांच्या खासदारकीची मुदत जुलै २०२८ पर्यंत आहे. सुमारे सव्वा चार वर्षे खासदारीची शिल्लक असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने प्रफुल पटेल यांनाच राज्यसभेची उमेदवारी का दिली असा सवाल उपस्थित केला जात आहे.