राजकारण

तामिळनाडुमध्येही ऑपरेशन लोटस! शशिकला होणार भाजपच्या 'एकनाथ शिंदे'?

Tamilnadu मध्येही महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल; भाजपचा दावा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चेन्नई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपशी (BJP) हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने ऑपरेशन लोटस (Operation Lotus) यशस्वी चर्चा आहेत. आता तामिळनाडूतही (Tamilnadu) महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तामिळनाडूमध्ये अनेक प्रयत्न करूनही भारतीय जनता पक्षाला फारसे यश मिळाले नाही. आता महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी तामिळनाडूतही भाजपला ‘एकनाथ शिंदे’ मिळण्याचा दावा केला आहे. नुकतेच व्ही.के. शशिकला यांची वक्तव्ये आणि त्यांची राजकीय खेळी पाहता भाजप शशिकला यांना पुढे करून मोठा डाव खेळण्याचा अंदाज वर्तविला जात आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच शशिकला यांची तुरुंगातून सुटका झाल्यामुळेही असे बोलले जात आहे.

एकीकडे ओ पनीरसेल्वम आणि ईके पलानीसामी एआयएडीएमके (AIADMK) पक्षावर वर्चस्व करण्यासाठी लढत आहेत. दुसरीकडे पक्षातून हकालपट्टी झालेल्या व्ही.के. शशिकला यांनी मी एआयएडीएमकेची सरचिटणीस आहे. वेळ आल्यावर मी पक्षाच्या मुख्यालयात जाईन. मला आमच्या नेत्या एमजीआर आणि अम्मा जयललिता यांच्याप्रमाणे पक्षाला पुढे घेऊन जायचे आहे. आमच्या कार्यकर्त्यांना हे चांगलेच माहित आहे, असे म्हंटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी तीन पक्षांच्या गटाने द्रमुक आणि काँग्रेस सारखी युती करण्यासाठी हातमिळवणी केली होती. आता एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्यावर महाराष्ट्रातील सरकार पडले आणि भाजपचे सरकार आले. तमिळनाडूतही तेच होईल, असा दावा त्यांनी केला आहे. तर, तामिळनाडूमधील लोकसभा निवडणुकीत आम्हाला 25 खासदार मिळतील. जे राज्यातील विधानसभा निवडणुकीत 150 आमदारांच्या बरोबरीचे आहेत, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे,

दरम्यान, शशिकला हळूहळू पुन्हा राजकारणात उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या महिन्यातच त्यांनी रोड शो केला होता. एमजीआर आणि जयललिता यांचा वारंवार उल्लेख करून त्या स्वत:ला या नेत्यांचा खरा वारसदार सांगत आहेत. या घटनांचा संबंध एकनाथ शिंदे यांच्या घटनाक्रमांशी लावला जात असून तामिळनाडूत महाराष्ट्राची पुनरावृत्ती होणार, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी