राजकारण

CM Nitish Kumar: नितीश कुमार यांनी नव्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. नव्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Published by : Dhanshree Shintre

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. नव्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. 5 वर्षात तिसऱ्यांदा नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. नितीश कुमार एनडीएमध्ये सहभागी झाले. रविवार 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि आरजेडी सोबतच्या सरकारमधून त्यांचा पाठिंबा काढून घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सपतविधी सोहळ्याला उपस्थित होते. नितीश कुमार यांच्यासह सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

नितीश कुमार यांनी नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. 1977 आणि 1980 मध्ये हरनौत मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. 1985 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात लोकदलाकडून निवडणूक लढली आणि त्यांनी त्यामध्ये विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जनता दलात प्रवेश केला आणि 1989 मध्ये लोकसभा निवडणूक लढवून ते लोकसभेत पोहोचले. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी संभाळली. 2000 मध्ये एनडीएला पहिल्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली.

विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्याने 7 दिवसांत त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 2005 च्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने नितीश कुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीमुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला. 2015 मध्ये पक्षांर्गत कलहामुळे मांझींनी हटवून पुन्हा मुख्यमंत्री ते विराजमान झाले. २०१५ च्या निवडणुकीत NDA विरुद्धच्या महाआघाडीतून पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले. 2022 मध्ये NDA ची साथ सोडत महाआघाडीत सामील झाले आणि आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज पुन्हा RJD शी पटत नसल्याचं कारण देत NDA सोबत जाण्याचा निर्णय घेत नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी