मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. बीकेसी येथे त्यांची सभाही होणार आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. मोदींची काळजी वाटते त्याच्याकडे कोणी नेते नाहीत. त्यांच्याशिवाय भाजपकडे चेहरा नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात पंतप्रधान येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. पण, भाजपला सरपंच ते पंतप्रधानांपर्यंत त्यांची गरज आहे. सुषमा स्वराज, अरुण जेठली यांच्याकडून शिकलो आहे. पण, आता भाजपकडे नेते नाहीत. मोदींची काळजी वाटते त्याच्याकडे कोणी नेते नाहीत. त्यांच्याशिवाय भाजपकडे चेहरा नाही, असा निशाणा सुप्रिया सुळे यांनी साधला आहे.
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक घ्या, अशी या ईडी सरकारला माझी प्रेमाने विनंती आहे. आपल्या स्वार्थापोटी निवडणुका घेत नाही. नगरसेवक नाहीत त्यामुळे अनेक लोकांची काम होत नाहीत. सरकारचा जाहीर निषेध करते.
ईडी सरकारमध्ये मंत्री कोण आहे माहिती नाही. ईडी सरकार कोण चालवतय कळत नाही. महिला मंत्री नाहीत. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका नसल्याने काम होत नाहीय. मंत्रिमंडळ विस्तार नाही. कोर्टात आम्ही उगाच गेलो नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
तर, राधाकृष्ण विखे-पाटील हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री केलं तर मला आनंदाच आहे. त्यांना शुभेच्छा. पण, भाजप काय करते किती त्याग करतेय बघा. कारण १०५ आमदार असून समजून घ्यावं लागतं आहे. शिंदे गटाची ज्याची केस कोर्टात सुरू आहे अशा आमदारांना सोबत घेऊन सत्तेत आहेत. उपमुख्यमंत्री घेतलं. मुख्यमंत्री पद सोडले. सगळया लोकांना कोर्ट केस असून सगळ्याना समजून घेऊन सत्तेत आहे. म्हणजे भाजपने मोठा त्याग केलाय. त्या १०५ आमदारांचा खरंतर सत्कार करायला पाहिजे, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा प्लॅन चांगला होता. आवडला मला. फोटो पणं चांगले काढले आहेत. दावोसला हैदराबादचे बरेच व्यापारी गेले होते. पण दावोसचा हेतू काय होता हे कळलं नाही. एवढं करण्यापेक्षा दावोसला जाण्यापेक्षा मुंबईतच मीटिंग करायची ना, असा टोला सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.