National Herald Case | Sonia Gandhi | Congress team lokshahi
राजकारण

National Herald case : यंग इंडियाचे कार्यालय सील, काँग्रेस मुख्यालयाजवळ कडक सुरक्षा

या कारवाईनंतर राहुल गांधींनी लिहिली फेसबुक पोस्ट

Published by : Team Lokshahi

national herald : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी दिल्लीतील यंग इंडियाचे कार्यालय सील केले. त्याचबरोबर एजन्सीच्या परवानगीशिवाय परिसर उघडू नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत. दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (national herald office seal in delhi ed action)

ईडीने मंगळवारी सोनिया गांधी-राहुल गांधी यांच्या कंपनी यंग इंडियाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित देशभरातील 12 ठिकाणी छापे टाकले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसचीही त्यांनी झडती घेतली होती.

छापेमारीनंतर राहुलने पोस्ट लिहिली

ईडीच्या या कारवाईनंतर राहुल गांधींनी फेसबुक पोस्टही लिहिली. त्यात त्यांनी लिहिले की, स्वत:ला एकटे समजू नका, काँग्रेस हा तुमचा आवाज आहे आणि तुम्ही काँग्रेसची ताकद आहात. आम्ही घाबरणार नाही. स्वत:ला एकटे समजू नका, काँग्रेस हाच तुमचा आवाज आहे आणि तुम्ही काँग्रेसची ताकद आहात. हुकूमशहाच्या प्रत्येक हुकुमाशी, जनतेचा आवाज दाबण्याच्या प्रत्येक प्रयत्नाशी आपल्याला लढावे लागेल. तुमच्यासाठी मी आणि काँग्रेस पक्ष लढत आलो आहे आणि यापुढेही लढणार आहोत.

या प्रकरणी गेल्या महिन्यात ईडीने काँग्रेस पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. ईडीने सोनिया गांधी यांच्या चौकशीच्या विरोधात काँग्रेसने देशव्यापी धरणे आंदोलन केले. यापूर्वी राहुल गांधी यांचीही ईडीने पाच दिवस चौकशी केली होती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी