संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे विजयाच्या नजीक जवळपास निश्चित मानला जात आहे. परंतु, विजयोत्सव साजरा करणार नसल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहीर केला आहे. सत्यजित तांबे यांचे जवळचे व नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी हा निर्णय घेतला आहे.
मानस पगार माझा सहकारी होता. युवक काँग्रेस मध्ये आणण्यासाठी मीच पुढाकार घेतला होता. या निवडणुकीत माझी बाजू खंबीरपणे तो मांडत होता. महाराष्ट्रात चांगला मित्र परिवार होता. मयत सागर मानस परिवाराची भेट घेयला आलो होतो. मानस जाण्याचे जे दुःख आमच्यासाठी मोठे आहे. या निवडणुकीच्या विजयाचा आनंद जरी असला तरी हा विजयोत्सव साजरा न करण्याचा आम्ही निर्णय आम्ही घेतला आहे, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, तिसऱ्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांना 45 हजार 660 मते मिळाली आहेत. तर, मविआ उमेदवार शुभांगी पाटील यांना 24 हजार 927 मते मिळाली आहे. तिसऱ्या फेरी अखेर सत्यजीत तांबे यांनी 20 हजार 733 मतांची आघाडी घेतली आहे.