आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आहे तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
6 अपर आयुक्त, 16 पोलीस उपायुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2493 पोलीस अधिकारी आणि 12,449 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीस बंदोबस्त
6 अपर पोलीस आयुक्त,
16पोलीस उप आयुक्त,
45 सहायक पोलीस आयुक्त
2493 पोलीस अधिकारी
12,449 पोलीस अंमलदार