राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. दिवसांदिवस वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जेव्हा संधी होती तेव्हा रस्त्यावर उतरले नाही. आता रस्त्यावर उतरत असल्याचं ते म्हणाले. शिवाय केवळ केंद्राकडं बोट दाखवून होत नाही. सत्ता हातात असताना ची चालवून दाखवावी लागते, असा टोलाही दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर?
जेव्हा संधी होती तेव्हा रस्त्यावर उतरले नाही. आता रस्त्यावर उतरत असल्याचं ते म्हणाले. शिवाय केवळ केंद्राकडं बोट दाखवून होत नाही. सत्ता हातात असताना ची चालवून दाखवावी लागते. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. पण, रस्त्यावर उतरण्याची जेव्हा संधी होती, तेव्हा उतरले नाही. सत्ता होती तोपर्यंत मास्क होता. सत्ता गेली लगेच मास्क उतरला. योग्य वेळी योग्य काम केलं नाही, तर चांगल्या माणसाबद्दल चुकीचा मॅसेज जातो. ठाकरे सरकार असताना महाराष्ट्र ठप्प झाला होता. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, आता सत्ता बदलताचं सगळे सण लोकं उत्साहानं साजरे करतात. एखादी अडचण आली तर त्यावर उपाय केला जातो. घरी कोणीच बसलेलं नाही. प्रत्येकाचे व्यवहार सुरू आहेत. कोरोना काळातील देणी आम्ही फेड केली आहे. राज्य सक्षमपणे चालवावं लागतं. केवळ केंद्राकडे बोट दाखवून होत नाही. आश्वासनांची पूर्तता आम्ही केलेली आहे. जे वेळेवर कर्ज भरत होते, त्यांना कर्जमाफी दिली. एकावेळी पाच लाख लोकांच्या अकाउंटला पैसे दिले, असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.