राजकारण

Sanjay Raut : आम्ही तिघांनी ठरवलं आहे, कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत होत आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आजच्या मेळाव्याचे यजमानपद शिवसेनेकडे आहे. आजच्या मेळाव्याचे उद्घाटनपर भाषण हे माननीय शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे 11 वाजता सुरु करतील.

पहिलं मार्गदर्शन उद्धव ठाकरे करतील आणि त्यानंतर इतर सगळं प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. तीन पक्षामध्ये एकवाक्यता आहे. जागावाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही तिघांनी ठरवलं आहे कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर बसवायचं.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख दोन दिवस दिल्लीत होते. त्या दिल्लीच्या दौऱ्यातील चर्चेतला एकच मुद्दा होता की, एकत्र लढायचं, एकत्र काम करायचं, या महाराष्ट्रामध्ये दरोडेखोरांचे सरकार बसलेलं आहे त्यांना हटवायचं. आज आम्ही रणशिंग फुंकतो आहे. आज सुरुवात होईल. त्यानंतर पुढील 3 महिने निवडणुका होईपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकत्र प्रचाराचे सुत्र हे पुढे नेऊ. असे संजय राऊत म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी