Kirit Somaiya MMS Video Call : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा खळबळजनक व्हिडीओ लोकशाहीच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असतील तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहे. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतीर तर दुसऱ्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या की, हा व्हिडीओ खरं की खोटं तपासून कारवाई होणे गरजंचं आहे. लोकप्रतिनिधीचं अशा पध्दतीने व्हिडीओ येणं हे अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहेत. किरीट सोमय्या प्रसिध्द व्यक्ती आहे. त्यांनी अनेक भ्रष्ट्राचार काढले आहेत. अशा पध्दतीचे व्हिडीओ येत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पहिजे असं माझं मत आहे. या व्हिडीओची याची शहनिशा करुन कारवाई होणं गरजेचे आहे.
नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलीय, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर आरोप करतात, दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात, चारित्र्यहानन करत असतात. सुपारी घेतल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असावं का अशी शंका येते. अशा पध्दतीचं वर्तन त्यांच्याकडून येत तर ते अधिक अधोरेखित होते. ही एक विकृत प्रवृत्ती आहे. हिसाब देना पडेगा, चारित्र्यशुध्द व्यक्तिमत्व आहे की नाही हे जनता ऑडिट करेल, असे सचिन सावंतांनी म्हंटले आहे.