राजकारण

'कर्नाटक नव्याने पाहूया' नागपुरात मुख्यमंत्री शिंदे दाखल होण्यापूर्वी कर्नाटकी पोस्टर वॉर?

मुंबईवरून नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून त्यानंतर ते समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी जाणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नालस्कर | नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपुरात येत आहेत. मुंबईवरून नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून त्यानंतर ते समृद्धी महामार्गाच्या पाहणीसाठी जाणार आहे. आणि त्यापूर्वी नागपूर विमानतळावर कर्नाटकमधील पर्यटन स्थळाची माहिती देणारे अनेक पोस्टर्स नागपूर विमानतळा बाहेरच्या ॲप्रोच रोडवर लावण्यात आले आहे.

'चला कर्नाटक पाहू या' अशा आशयाचे संदेश या पोस्टर्सवर असून कर्नाटकमधील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळाचे फोटो या पोस्टर्स वर आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई आणि कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंद सिंह यांचे फोटोही या पोस्टर्स वर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरला येण्यापूर्वी कर्नाटकाची ही खरोखर पर्यटन स्थळांची प्रसिद्धी मोहीम आहे, की आणखी एक कर्नाटकी नाटक आहे, असा प्रश्न कर्नाटक सरकारच्या या पोस्टर सर्जिकल स्ट्राइकमुळे निर्माण झाला आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही आहे. जत तालुक्यात पाणी सोडल्यानंतर बोम्मई यांनी मोठे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येवू नये, असा इशारा कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची ही बोंबाबोंब कधी थांबणार आहे. आणि महाराष्ट्र सरकार याला कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी