भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्या नंतर रविवारी सायंकाळी भिवंडी ग्रामीण मध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडों कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.या वेळी सुषमा अंधारे यांनी भाजपासह शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.
चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाचे वाईट नाही वाटले, महाविकास आघाडीतील काँग्रेसने चांगली लढत दिली आहे. प्रदेश मध्ये अँड निवडणुकीच्या काळात लाडली बहन योजना जाहीर करून आचारसंहिता सुरू असताना पैसे वाटले हा आचारसंहितेचा भंग आहे पण त्याकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष सोयीस्कर केले. काँग्रेसने रोखले या बद्दल काँग्रेसचे अभिनंदन करीत सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना भाजपा मराठा व ओबीसी समाजाला आपापसात झुंजवत कलगीतुरा करत आहे. आरक्षणासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्य कडून केंद्राकडे गेले आहेत .भाजपाचे आरक्षण देण्याची खरी नियत असेल तर त्यांनी विधानसभेत कायदा करून केंद्राकडे पाठवावा केंद्राने विशेष अधिवेशन घ्यावे भाजपाने जतिजाती यांना आपापसात झुंजवू नये असा आरोप केला आहे.
एकीकडे दुष्काळ व त्यानंतर अवकाळी यामुळे शेतकरी त्रस्त असताना सरकारला त्याकडे बघण्यासाठी वेळ नाही,तृणधान्य वर्ष साजरे करताना ज्वारी चा समावेश तृणधान्य होत असताना नुकसानीची शासकीय पोर्टल वर माहिती भरताना त्यामध्ये ज्वारीचा रकाना नाही,सरसकट कर्ज माफी देणे गरजेचे आहे. पीक विम्याची जाहिरात केली जाते पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही शेतीसाठी चुकीचे आयात धोरण यामुळे शेतकरी त्रस्त आहे अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.