प्रशांत जगताप | सातारा : महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) निम्मे वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त शिवसेना आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी महाविकास आघाडीची लव्हस्टोरी सांगितली आहे. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित जाहिर सभेत बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, पहिले शिवसेना-भाजपचं लफडा होता. पहिले आय लव यू झालं, ते तुटलं. मात्र, तीन तिघाडा काम बिघाडा असे म्हणायचे पण तिघे एकत्र आले. पण त्यात पहिले प्यार का वादा फिफ्टी-फिफ्टी होणार होता. 50-50 टक्के मंत्री किंवा 40/60 टक्के झाले असते. आणि शिवसेनेच्या वाटेवर वीस मंत्री पद आले असते. मात्र तसं न होता केवळ 13 मंत्रीपद शिवसेनेच्या वाटेवर आले व त्यात सात कॅबिनेट मंत्री पद शिवसेनेच्या वाटेला आले. त्यात माझा नंबर लागला, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
महाविकास आघाडीत शिवसेनेला वीस मंत्रिपद अपेक्षित होते. मात्र, 13 मंत्रीपद शिवसेनेच्या वाटेला आल्याची खंत गुलाबराव पाटील यांनी भाषणादरम्यान व्यक्त केली आहे.
तर, राजकारणात आलो नसतो तर मी किर्तनकार झालो असतो, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. आता मंत्री असल्याने विरोधकांना पाहिजे त्या शब्दात उत्तर देता येत नाही. मात्र, कीर्तनकार असतो तर इंदुरीकर महाराजांच्या सोबतच राहिलो असतो. अर्धे कीर्तनकारांचे दुकान बंद करून टाकले असते. नाटकातही मी काम केला असल्याचे आठवण करून देत त्या नाटकातून निघालो. राजकारणाच्या नाटकात आलो असल्याचे यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले