मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होत असलेल्या सभेत मोठा राडा झाला आहे. मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दोन्ही गटाचे लोकं एकमेकांसमोर आले आहेत. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज ठाकरेंविरोधात केलेल्या विधानामुळं हे प्रकरण पेटलं आहे यावेळी मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांन ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसोबत हाणामारी केली. यावेळी इथं जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
कालच बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याआधी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरे यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. यावेळी उद्धव ठाकरेंची सभा देखील उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता.
योवेळी मनसेचे पदाधिकारी-कार्यकर्ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते यांची उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसोबत जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकलं तसेच बांगल्या आणि नारळ फेकले. याविळी गडकरी रंगायतनबाहेर मोठ्या प्रमाणावर दोन्हीकडील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे. अजूनही कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायाला मिळत आहेत.