राजकारण

Narhari Zirwal : झिरवळांविरोधात एकनाथ शिंदे गट कोर्टाचं दार ठोठावणार

निलंबनाच्या नोटीसविरोधात याचिका करणार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह बंडखोर आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari zirwal) यांनी निलंबनाची नोटीस बजावली आहे. यामुळे शिंदेंच्या गोटात खळबळ माजली असून याविरोधात एकनाथ शिंदे गट कोर्टाचं दार ठोठावणार आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन करुनही शिंद गट माघार घेण्यास तयार नसल्याने शिवसेनेने कडक भूमिका घेत 16 आमदारांची निलंबनाची नोटीस बजावण्याची मागणी नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली असून त्यांना ४८ तासांचे अल्टीमेटम दिले आहे. तर, नोटीसीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते. एकनाथ शिंदेंना मेल करून नोटीस पाठवण्यात आली. यामुळे शिंदे गटात खळबळ माजली आहे. तर, झिरवळांविरोधात शिंदे गट कोर्टात जाणार आहे. निलंबनासाठी 7 दिवसांच्या मुदतीऐवजी 2 दिवसांची नोटीस का? असा प्रश्नही बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी विचारला आहे.

तर, नरहरी झिरववळांविरोधात शिंदे गटानेही कंबर कसली असून उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. हा प्रस्ताव पारित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हा प्रस्ताव पारित झाल्यास लवकरच विधानसभेत प्रोटेम स्पीकर नियुक्त होऊ शकतो. व यानंतर विधानसभेत संख्याबळ परीक्षण करण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी