मुंबई : मराठी भाषा भवनचे काम वेगाने करू. आपल्या कामाचा वेग जरा जास्त आहे. मराठी भाषा भवनचे काम त्यासमोरील समुद्रकिनारा आम्हाला पामराला म्हणेल असे काम करू, असे चिमटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले आहेत. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मराठी किती प्राचीन व समृद्ध हे सर्वच जाणतो. भक्कम असा पाया मराठीला आहे. भाषा हे आपल्या जगण्याचे साधन असते. मराठी भाषा ही जेवढी जास्त वापरू तेवढी समृद्ध होईल. भाषा ही प्रवाही असावी, तेवढी ती वाढते. देवाण-घेवाणीमुळे भाषा प्रवाही राहते. आवर्जून सर्वांनी मराठी बोलले व लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे. आपले साहित्य एक अनमोल ठेवा आहे. आपल्यासाठी वरदान आहे. अजरामर साहित्य कृती निर्माण करणाऱ्या साहित्यिकांना मुजरा करतो. 'जय जय महाराष्ट्र' गीताला राज्यगीताचा दर्जा दिला आहे. भाषेच्या पातळीवरही महाराष्ट्र गर्जत राहिल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मराठी भाषा अधिकाधिक श्रीमंत व प्रगल्भ होत जाईल. संशोधनाच्या आधारे मराठी भाषा ही अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे पुरावे आहेत. मराठीत आजही चांगले साहित्य निर्माण होत आहेत. चांगले लेखक निर्माण होत आहेत. ई बुक व ऑडियो बुक माध्यमातून मराठी साहित्याचा प्रचार व प्रसार सुरु आहे. मराठी भाषा अधिक उजळून निघेल, यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करतं आहे. आपली जबाबदारी व कर्तव्ये आहे.
भाषेच्या विकासाचे व संशोधनाचे प्रश्न मार्गी लावू. राजकारणी राजकारणाची भाषा करतो. पण, भाषेचे राजकारण करत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू. आपली मागणी मार्गी लावू. त्यासाठी हवे ते प्रयत्न करू. मराठी भाषा भवनचे काम वेगाने करू. आपल्या कामाचा वेग जरा जास्त आहे. मराठी भाषा भवनचे काम त्यासमोरील समुद्रकिनारा आम्हाला पामराला म्हणेल असे काम करू, असे म्हणत त्यांनी उध्दव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतात, त्यांचा मान ठेवला जाईल. त्यांना एक वेगळा स्टेटस दिला जाईल. जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते. तीच विश्वाची भाषा बनते. हे सर्व गुण मराठीत म्हणून ती विश्वाची भाषा आहे, असेही शिंदेंनी म्हंटले आहे.