राजकारण

दिपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी, ठाकरे गटाला धडकी

दिपाली सय्यद यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांना परत येण्याची विनंती

Published by : Sagar Pradhan

राज्याच्या राजकारणात सध्या दररोज अभूतपूर्व घडामोडी होत आहे. अशातच नवीन, नवीन विषयाला तोंड फुटत असताना. ठाकरे गटाला हादरा बसणारी बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे शिवसेनेच्या नेत्या, अभिनेत्री दिपाली सय्यद आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. दिपाली सय्यद अचानक वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने ठाकरे गटात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

शिवसेनेत जेव्हा बंडखोरी झाली होती. तेव्हा दिपाली सय्यद यांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटात परत यावे अशी विनंती केली होती. त्यानंतर विशेष म्हणजे त्यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्याबाबत ट्विटरवर केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली होती. एवढ्या सगळ्या घडामोडींनंतर दिपाली सय्यद एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाल्याने विविध प्रश्नांना तोंड फुटले आहे. त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आधीपासूनच रंगल्या आहे. त्यामुळे त्या वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यामुळे वेगवेगळे तर्क - वितर्क लावण्यात येत आहे. दिपाली सय्यद यांचे मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे कारण मात्र अद्यापही कळू शकलेले नाही आहे.

नुकताच पार पडलेल्या दसऱ्या मेळाव्यात देखील दिपाली सय्यद उपस्थित नव्हत्या. त्यामुळे दिपाली सय्यद या नाराज आहेत अश्या चर्चा होत्या. या नाराजीमुळे त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. ठाकरे-शिंदे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न त्यांनी केला पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता दिपाली सय्यद याच एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी