राजकारण

दिपाली सय्यद शिंदे गटात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सय्यद म्हणाल्या,आपण जायला हवं...

उद्धव ठाकरे यांनी आधीच या दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती

Published by : Sagar Pradhan

शिवसेना ठाकरे गटातील नेत्या दिपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि दिपाली सय्यद यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यावरच वर्षा बंगल्यातून बाहेर निघताच ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी कुणावरही नाराजी नाही. असे त्यावेळी माध्यमांना बोलताना म्हणाल्या आहे.

काय म्हणाल्या दिपाली सय्यद?

मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “माझी कुणावरही नाराजी नाही. कुणी कुठे आले आणि कुणी कुठली जागा घेतलीय त्याच्यामुळे मी नाराज आहे, असं काहीही नाही. प्रत्येकाची जागा प्रत्येकजण स्वत:च्या मेहनतीने स्थापन करतं. त्यामुळे माझी नाराजी नाही”, असं बोलताना दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “मी गेल्या दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडींदरम्यान राजकारणात सक्रिय आहे. काही गोष्टी प्लॅनिंग करायच्या असतात. काही कामं करायची असतात. प्रत्येकाची वेगळ्या पद्धतीची इच्छा आहे. पण आपण जे काम करतो त्या कामाला एक स्थान मिळतं. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आपला नेता सपोर्ट करत असेल तर मला असं वाटतं की आपण त्यांच्याबरोबर जायला हवं”, असे सूचक विधान यावेळी त्यांनी केले.

भविष्यातही शिंदे-ठाकरे एकत्र यावेत अशी इच्छा आहे. पण त्याला थोडा वेळ लागतो. त्याला आपण काय करु शकतो?”, असा प्रश्न दिपाली सय्यद यांनी उपस्थित केला. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्याला जात आहेत. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो. त्यांनी आधीच दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती. पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर पक्षात फूट पडली नसती, माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच होते. आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगणार आहे. काही काम करायचे असेल तर आता आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो. ते खूप महत्त्वाचे आहे, असं त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी